Chikhali : बहिणीशी वाद घातल्याने वडील मुलावर रागावले; म्हणून मुलाने केली आत्महत्या

The father was angry with the boy for arguing with his sister; So the boy committed suicide

एमपीसी न्यूज – बहिणीशी वाद घालणाऱ्या मुलाला त्याचे वडील रागावले. या कारणावरून मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 19) रात्री रुपीनगर, तळवडे येथे घडली. आत्महत्या करणारा मुलगा अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता.

प्रणय किशोर भोई (वय 20, रा. रुपीनगर, तळवडे) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे शाळा महाविद्यालये बंद आहेत. प्रणयला देखील सुट्टी होती. त्यामुळे तो घरीच होता.

रविवारी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास प्रणव याची बहीण देव्हाऱ्यातील निरांजनला मच्छर मारण्याची अगरबत्ती पेटवत होती. या कारणावरून प्रणव याने त्याच्या बहिणीशी वाद घातला.

तिथेच प्रणवचे वडील होते. दोघांचा वाद सुरु असल्याने वडील प्रणवला रागावले आणि त्यांनी प्रणयला रागावून त्याच्या खोलीत जाण्यास सांगितले. प्रणय रागातच आपल्या खोलीत निघून गेला. रात्री प्रणय जेवण करण्यासाठी आला नाही. म्हणून त्याचे वडील त्याच्या खोलीत पाहण्यासाठी गेले.

बराच वेळ आवाज दिला. मात्र प्रणयने दरवाजा उघडला नाही आणि आतून प्रतिसाद देखील दिला नाही. वडिलांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

त्यावेळी प्रणव याने साडीच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.