Chikhali : आई-वडिलांच्या भांडणात मुलगी घाबरून ओरडली म्हणून वडिलांनी लाकडाने मारले

एमपीसी न्यूज – आई -वडिलांचे भांडण सुरु होते. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने मोठमोठ्याने टाहो फोडला. यामुळे वडिलांनी मुलीला लाकडाने मारले. यामध्ये मुलगी जखमी झाली. ही घटना रविवारी (दि. 26) दुपारी साडेचारच्या सुमारास म्हेत्रेवस्ती, चिखली येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

पूर्वी बाळू जावळे (वय 12) या चिमुरडीने याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यानुसार वडील बाळू आबाराव जावळे (वय 34) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू आणि त्याच्या पत्नीचे रविवारी दुपारी जोरजोरात भांडण सुरु होते. या भांडणामुळे पूर्वी घाबरली. तिने अचानक मोठमोठ्याने टाहो फोडला. यांचा बाळूला राग आला. त्याने चुलीजवळ पडलेल्या लाकडाने पूर्वीला मारले. यामध्ये पूर्वीच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.