Chikhali: प्रॉपर्टी नावावर करुन देण्यासाठी पतीची पत्नीला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – पत्नीकडे नावावरील सर्व प्रॉपर्टी आपल्या नावावर करुन देण्याची मागणी करत पतीने पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि.23) त्रिवेणीनर येथे रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडली.

_MPC_DIR_MPU_II

शाम रामदास सावंत (रा. रुपीनगर, तळवडे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुषमा शाम सावंत (वय 35)यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुषमा आणि शाम हे पती-पत्नी आहेत. शाम याने प्रापंचिक कारणावरुन आणि चारित्र्यावर संशय घेऊन वेळोवेळी शिवीगाळ करत मारहाण केली. शारिरीक आणि मानसिक छळ केला. तसेच तुझ्या नावावरील सर्व प्रॉपर्टी माझे नावे करुन दे, असे म्हणून सुषमा यांच्या अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी दिली. चिखली पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.