Chikhali : पादचारी महिलेच्या गळ्यातून सव्वालाखाची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातून 51 ग्रॅम वजनाची एक लाख तीस हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हीसकावली. ही घटना मंगळवारी (दि. 14) रात्री नऊच्या सुमारास कुदळवाडी येथे घडली.

वैशाली गजानन लांडे (वय 40, रा. घरकुल, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दुचाकीवरील दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास जाधववाडी ते कुदळवाडी या मार्गावरून रस्त्याने पायी चालत जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 51 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व साखळी असा एकूण एक लाख तीस हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.