Chikhali : वृद्ध महिलेची सोन्याची पाटली प्रवासादरम्यान हातचलाखीने पळवली

एमपीसी न्यूज – प्रवासादरम्यान वृद्धेची चार लाखांची सोन्याची पाटली चोरट्याने हातचलाखीने पळवली. ही घटना शनिवारी (दि. 6) सकाळी दहा ते साडे बाराच्या सुमारास चिंचवड स्टेशन ते पूर्णानगर दरम्यान घडली.

नलनी ज्ञानदेव सपकाळ (वय 57, रा. फुरसुंगी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची सपकाळ या शनिवारी भेकराईनगर ते निगडी या बसने चिंचवड स्टेशनवरून पूर्णानगर चिंचवडच्या दिशेने प्रवास करीत होत्या.

दरम्यान, अज्ञात चोरट्याने हातचलाखी करीत त्यांच्या हातातील चार लाख रुपये किमतीची सोन्याची पाटली चोरून नेली. याप्रकणारी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.