Chikhali : पादचा-याचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चाललेल्या तरुणाच्या हातातील मोबाईल दुचाकीवरील दोन चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना चिखली येथे घडली.

मौलाली खाजाभाई नदाफ (वय 22, रा. आंबेडकरनगर, नेहरूनगर, पिंपरी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दुचाकीवरील दोन चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी मौलाली यांचा भाचा अविनाशकुमार श्रीराजेंद्रकुमार (वय 17) हा पायी जात होता.

तो जाधववाडी, चिखली येथे आला असता दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील साडेसहा हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक सोलापूरे याचा तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.