Chikhali : साने चौक पोलीस चौकीवर नागरिकांची दगडफेक

एमपीसी न्यूज – साने चौक पोलीस चौकीवर स्थानिक नागरिकांनी दगडफेक केली. ही घटना आज (रविवारी) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिखली पोलीस ठाण्यांतर्गत साने चौक पोलीस चौकी येते. पोलीस चौकीमध्ये तक्रार घेण्यावरून आज वाद झाला. त्या वादातून दगडफेक केल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात असून चिखली पोलीस तपास करीत आहेत.
  • घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. तसेच जखमींची देखील अद्याप माहिती मिळाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.