Chikhali : ‘भाऊ’ म्हणाला नाही म्हणून तरुणाला दांडक्याने मारहाण

एमपीसी न्यूज – एका तरुणाला ‘भाऊ’ का म्हणाला नाही. तसेच गाडीकडे बघून खुन्नस का देतोस, असे म्हणत चार जणांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 16) रात्री पावणेदहा वाजता रोकडे वस्ती, चिखली येथे घडली.

मनोज हाडे, किरण रोकडे, मुंग्या रोकडे, सुरज खपाले (सर्व रा. चिखली गाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निखिल चंद्रकांत गाडेकर (वय 22, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री फिर्यादी गाडेकर जेवण करून त्यांच्या घराच्या बाहेर बसले होते. तिथे आरोपी मनोज आला. त्याने आरोपी किरण याला भेटण्यासाठी रोकडेवस्ती येथे येण्यास सांगितले. गाडेकर किरण याला भेटण्यासाठी रोकडेवस्ती येथे गेले.

तिथे आरोपी मुंग्या याने ‘तू माझ्या गाडीकडे बघून खुन्नस का देतो’ आणि आरोपी मनोज याने ‘तू करण रोकडे याला भाऊ का बोलला नाही’ असे म्हणत हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तर मनोज याने लाकडी दांडक्याने डोक्यात मारून जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.