Chikhali : चिखलीत पुन्हा एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – तीन आठवड्यांपूर्वी चिखली परिसरातील दोन एटीएम चोरट्यांनी फोडले. त्यानंतर गुरुवारी (दि. १२) पहाटे म्हेत्रेवस्ती, चिखली येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हेत्रेवस्ती चिखली येथे आयसीआयसीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. पहाटे दोन वाजताच्या सुमारास एक चोरटा पैसे काढण्याच्या निमित्ताने एटीएम सेंटरमध्ये येऊन पाहणी करून गेला. त्यानंतर पहाटे चार वाजताच्या सुमारास तीन चोरटे एटीएम सेंटरमध्ये आले. त्यांनी आतील सीसीटीव्ही कॅमेरा बाहेरील रोडच्या दिशेला फिरवला. त्यानंतर एटीएम सेंटरमधील दर्शनी भागाची तोडफोड केली. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. हे चोरटे स्थानिक असावेत, असा अंदाज पोलीस व्यक्त करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.