Chikhali : लॉक करून ठेवलेली बजाज पल्सर चोरट्यांनी पळवली

Thieves snatched the locked Bajaj Pulsar

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या पार्किंगमध्ये लॉककरून पार्क केलेली बजाज पल्सर दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 24 मे रोजी सकाळी कृष्णानगर, चिंचवड येथे उघडकीस आली.

रणजित किशोर दिवटीया (वय 37, रा. आराधना हाऊसिंग सोसायटी, कृष्णानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रणजित यांनी त्यांची 40 हजार रुपये किमतीची बजाज पल्सर (एमपी 09 / एनबी 4434) 23 मे रोजी रात्री साडेआठ वाजता सोसायटीच्या पार्किंगमध्ये लॉककरून पार्क केली.

रात्री अज्ञात चोरट्यांनी पल्सर दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. 24 मे रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.