Chikhali : चिखली, चाकणमधून चोरटयांनी दोन दुचाकी पळविली; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – चिखली परिसरातील एका हॉटेलसमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. तर चाकण येथील खासगी पार्किंगमधून एक दुचाकी चोरीला गेली. याबाबत मंगळवारी (दि. 5) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दीपक जोतिराम घाडगे (वय 50, रा. पद्मावती, पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दीपक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दीपक यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची एमएच 42 ही दुचाकी 30 ऑक्टोबर रोजी आंबेठाण चौकातील सतीश बारवकर यांच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 4 नोव्हेंबर रोजी उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

तर, संतोष अर्जुन होले (वय 41, रा. आकुर्डी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे.

संतोष यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संतोष यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची एमएच 14 / बी डब्ल्यू 6900 ही दुचाकी 14 ऑक्टोबर रोजी मोरेवस्ती चिखली येथील सूर्याजी हॉटेल समोर पार्क केली. दुपारच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.