Chikhali : तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये वाहनांच्या धडकेत तिघांचा मृत्यू; संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद

एमपीसी न्यूज – तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये भरधाव वेगात आलेल्या वाहनांच्या धडकेत तीन पादचा-यांचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी चिखली, चाकण आणि आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शारदा नामदेव श्रीगोंड (वय 46, रा. घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारदा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 17 नोव्हेंबर रोजी फिर्यादी शारदा यांचे पती नामदेव फकिरप्पा श्रीगोंड (वय 54) यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. अज्ञात वाहन चालक घटनेची माहिती न देता पळून गेला. ही घटना स्पाईन रोड चिखली येथे सर्व्हिस रोडवर घडली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

अंजना भानुदास गव्हाणे (वय 55, रा. भोसरी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विजयसिंग गएसिंग पाटील (वय 30, रा. जुनी सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजना यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. 30) दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी अंजना आणि त्यांची बहीण आकाबाई कुरमीदास लांडे या दोघी पुणे-नाशिक महामार्गावरून कुरुळी फाटा येथून रस्त्याने पायी चालत जात होत्या. आरोपी विजयसिंग याच्या कारने (एम एच 43 / डी 9401) अंजना आणि त्यांच्या बहिणीला धडक दिली. यामध्ये अंजना गंभीर जखमी झाल्या. तर त्यांची बहीण आकाबाई यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

पोलीस हवालदार दत्तात्रय ज्ञानेश्वर टोके यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 25 जानेवारी 2016 रोजी आळंदी येथील चाकण चौकात अज्ञात वाहनाने एकाला धडक दिली. त्यात जखमी इसमाचा मृत्यू झाला. घटनेनंतर वाहनचालक पोलिसांना माहिती न देता पळून गेला. या प्रकरणी तीन वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.