Chikhali : घराची कडी उघडून तीन मोबाईल फोन पळवले

एमपीसी न्यूज – खिडकीतून आत हात घालत दरवाजाची कडी उघडून चोरट्याने आतील 18 हजारांचे तीन मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना रुपनगर, तळवडे येथे रविवारी (दि. 15) पहाटे उघडकीस आली.

आदेश नानाभाऊ इथापे (वय 21, रा. सप्तश्रृंगी हौसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दहा ते रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या दरम्यान फिर्यादी इथापे यांचे घर आतून बंद होते. त्यावेळी चोरट्याने खिडकीतून आत हात घालत दरवाजाची कडी उघडली. त्यानंतर आत प्रवेश करीत 18 हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल चोरून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.