Chikhali : विनयभंगाच्या तक्रारीची टाळाटाळ भोवली ; एक अधिकारी दोन कर्मचारी निलंबित

एमपीसी न्यूज- अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची तक्रार घेण्यासाठी केलेली टाळाटाळ चिखली पोलिसांना चांगलीच भोवली. या प्रकरणाची थेट पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत शनिवारी ( दि.30) एक सहायक निरीक्षक तर दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन केले.

सहाय्यक निरीक्षक नीलेश जगदाळे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय माळवदकर आणि राजेंद्र किरवे अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत.

एका १४ वर्षीय मुलीच्या विनयभंगाची तक्रार देण्यासाठी पीडित मुलीचे वडील पोलीस चौकीत गेले. मात्र यांची तक्रार घेतली गेली नाही. त्यानंतर वडील अनेकदा पोलीस ठाण्यात गेले. मात्र तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. शेवटी मुलीच्या वडिलांनी थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी घटनेची माहिती घेतली असता तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ केल्याचे समोर आले. आयुक्तांनी लागलीच कारवाई करत तिघांना निलंबित केले तर इतर तीन कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.