Chikhali: पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – दुचाकीवर आलेल्या चोरटयांनी पादचारी तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. ही घटना शनिवारी (दि. 12) सायंकाळी साडेसातच्या सुमारास स्पाईनरोड, चिखली येथे घडली.

अमोल उत्तम चव्हाण (वय 28, रा. ताम्हाणेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीवरील तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल कामावरून घरी चालले होते. दरम्यान, स्पाईनरोड येथील विनायक स्वीट होम येथे आले असता दुचाकीवर आलेल्या चोरटयांनी त्यांच्या हातातील 11 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला.

अमोल यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटे भरधाव वेगात तळवडेच्या दिशेने निघून गेले. पुढील तपास सहायक निरीक्षक म्हस्के करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1