Chikhali : उघड्या दरवाजावाटे दुकानातून 35 हजारांची तंबाखू, सिगारेट चोरीला

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी दुकानातून 35 हजार रुपयांचे तंबाखू आणि सिगारेट चोरून नेले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 27) पहाटे शरदनगर, चिखली येथे उघडकीस आली.

किरण शोभाचंद कोठारी (वय 42, रा. शरदनगर, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोठारी यांचे शरदनगर चिखली येथे स्पाईन रोडवर किरण एजन्सी हे दुकान आहे. 24 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश करून दुकानातून 35 हजार रुपये किमतीचे तंबाखू आणि सिगारेट चोरून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.