_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Chikhali : जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सोसायटीचा देखभाल खर्च देण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात दोघांनी सोसायटीमधील एका सदस्याला जातीवाचक शिवीगाळ केली. ही घटना चिखली येथील घरकूलमध्ये घडली.

धनंजय इंद्रजीत मोरे आणि फूलचंद बाबूराव बनसोडे (दोघेही रा. आनंदवन हौसिंग सोसायटी, घरकुल, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत विष्णू साहेबराव उनावणे (वय 37) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 20 जून 2019 आणि 13 ऑक्‍टोबर 2019 रोजी घरकूल येथे घडली. सोसायटीचा देखभाल खर्च आणि भांडणात मध्यस्थी केली म्हणून आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ केली. पोलीस निरीक्षक जवादवाड याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.