Chikhali : ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक; 44 हजारांचे 13 ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज जप्त

एमपीसी न्यूज – ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोघांना चिखली येथे अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 43 हजार 900 रुपयांचे 13.63 ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई अंमली पदार्थविरोधी पथक आणि चिखली पोलिसांनी संयुक्तपणे केली.

मोहम्मद दाऊद अब्दुल रशीद माणक्या (वय 45, रा. सांताक्रूझ ईस्ट, गोळीबार रोड, मुंबई), मोहम्मद शाहिद शकील अश्रफी (वय 39, कोंढवा खुर्द) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

  • याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थांचा गैरव्यवहार करणा-या इसमांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी चिखली येथे अंमली पदार्थविरोधी पथकाने पोलीस गस्त घालत असताना पोलीस नाईक संतोष दिघे यांना माहिती मिळाली की, मॅफेड्रॉन (एमडी) हे ड्रग्ज विकण्यासाठी दोघेजण पूर्णानगर चिखली येथे शनी मंदिराजवळ येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा अरचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 43 हजार 900 रुपयांचे 13.63 ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे. चपाईतकर, पोलीस कर्मचारी प्रदीप शेलार, राजेंद्र बांबळे, रमेश भिसे, राजन महाडिक, संतोष दिघे, दिनकर भुजबळ, शैलेश मगर, दादा धस, प्रसाद जंगीलवाड, संतोष भालेराव, अशोक गारगोटे, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.