Chikhali : पिंपरी, चिखलीमधून दोन दुचाकी पळविल्या; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वाहनचोरी ही पिंपरी-चिंचवड शहरात नित्याची बाब बनली आहे. वाहन चोरी होण्याचे प्रकार दररोज घडत आहेत. चिखली आणि पिंपरी परिसरात दोन दुचाकी चोरीला गेल्याबाबत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

सचिन शिवाजी राठोड (वय 27, रा. शिवशंकर हाऊसिंग सोसायटी क्रमांक एक, म्हेत्रेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राठोड यांनी 4 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता त्यांची दुचाकी राहत्या घरासमोरील सार्वजनिक रोडच्या बाजूला लॉक करून पार्क केली. अज्ञात चोरटयांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 5 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

वाहन चोरीचा दुसरा प्रकार पिंपरीमधील वल्लभनगर येथे घडला. कोशी फिलिप (वय 72, रा. सुखवानी कॅम्पस, वल्लभनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता फिर्यादी यांनी त्यांची एम एच 14 / डी झेड 2517 ही दुचाकी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लगेच अर्ध्या तासात उघडकीस आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.