_MPC_DIR_MPU_III

Chikhali : पादचा-याचा मोबाईल हिसकावणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – कंपनीतून सुट्टी झाल्यानंतर घरी जात असलेल्या पादचा-याचा मोबाइल दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. त्यांच्या दुचाकीच्या क्रमांकावरून पोलिसांनी त्यांचा शोध घेतला आणि दोन्ही चोरट्यांना अटक केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 4) रात्री सव्वाआठच्या सुमारास तळवडे येथे घडला.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

दीपक मारुती राजगुरु (वय 24) व हर्षद बालाजी माने (वय 24, दोघे रा. ओटस्किम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. राजू जयकृष्ण बेहेरा (वय 19, रा. सहयोगनगर, रुपीनगर, तळवडे, मुळगाव मु. बहुलंगा, पो. बडनापूट, ता. तिघीरिया, जि. कटक, राज्य उडिसा) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिंसानी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीतून सुट्टी झाल्यानंतर फिर्यादी बेहेरा त्यांच्या घरी एकटेच चालत जात होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून आले. त्यांनी बेहेरा यांच्याकडील 10 हजार रुपये किमतीचा मोबाइल फोन जबरदस्तीने हिसकावला. त्यानंतर तळवडे रोडवरून त्रिवेणीनगरकडे जाणा-या रस्त्याच्या दिशेने पळून गेले. याबाबत बेहेरा यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. तसेच आरोपींच्या दुचाकीचा क्रमांक त्यांच्या लक्षात राहिल्याने त्या क्रमांकावरून पोलिसांनी दुचाकीमालकाचा शोध घेतला. त्यामुळे दुचाकीमालकाचा नाव व पत्ता उपलब्ध झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी यांना त्यांच्या घरी जाऊन ताब्यात घेऊन अटक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.