Chikhali : वाहनांची रहदारी थांबवुन शिक्षकांनी वाचवले रस्त्यावर चालणा-या कासवाचे प्राण

एमपीसी न्यूज- वाहनांची रहदारी थांबवुन दोन शिक्षकांनी रस्त्यामधून निघालेल्या कासवाचे प्राण वाचवले. ही घटना चिखलीच्या साने चौकाजवळ घडली.

चिखलीकडुन साने चौकाकडे विकास ओव्हाळ आणि विशाल गाढवे हे दोन शिक्षक येत असताना त्यांना एक कासव संथगतीने रस्त्यावरून चालताना दिसले.
भरधाव वाहनाच्या खाली हे कासव सापडू नये म्हणून त्यांनी त्वरित रस्त्यावरील वाहतूक थांबवली. त्या कासवाला अलगद उचलून घेतले.आणि संत बहिणाबाई चौधरी उद्यानाकडे सोपवण्यात आले.

चिखली परिसरात अशा प्रकारचे कासव प्रथमच पाहण्यात आले. कासवाचे प्राण वाचवल्याचे समाधान दोन्ही शक्षकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.