Chikhali : कारच्या धडकेने दुचाकीस्वार महिला जखमी 

Two-wheeler woman injured in car crash

एमपीसी न्यूज – सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या कारने धडक दिली. त्यामुळे खाली पडून दुचाकीस्वार महिला जखमी झाली. तसेच दुचाकीचे नुकसान झाले. हा अपघात कुदळवाडी येथे रविवारी सायंकाळी (दि. 2) सहाच्या सुमारास झाला.

पुर्णीमा रवींद्र गायकवाड (वय 43, रा. जाधववाडी, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 2) फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहन चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दुचाकीवरून कासारवाडी येथून कुदळवाडीतील डायमंड चौकमार्गे घरी जात होत्या. त्यावेळी डायमंड चौक येथे फिर्यादी सिग्नलवर थांबल्या होत्या.

दरम्यान, आरोपी याने त्याच्याकडील कार भरधाव चालून फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे खाली पडून फिर्यादी जखमी झाल्या. तसेच त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले. अपघातानंतर आरोपी घटनास्थळी न थांबता पळून गेला.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.