Chikhali : ठरल्याप्रमाणे फॅब्रिकेशनचे काम न करता ग्राहकाची 39 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – फॅब्रिकेशनचे काम करण्यासाठी ग्राहकाकडून पैसे घेतले. मात्र ठरल्याप्रमाणे काम न करता व्यावसायिकाने ग्राहकाची 39 हजार 353 रुपयांची फसवणूक केली. ही घटना कृष्णानगर चिंचवड येथे घडली.

सुनील रामदास वाणी (वय 52, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमित चक्रवर्ती (रा. ज्योतिबा नगर, तळवडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित चक्रवर्ती याचे ज्योतिबा नगर तळवडे येथे हुमा बेकरीच्या मागे पद्मावती इंटरप्रायजेस नावाचे दुकान आहे. अमित याने सुनील यांचे फॅब्रिकेशनचे काम घेतले. त्यासाठी सुनील यांनी 39 हजार 353 रुपयांचा चेक अमितला दिला. ठरल्याप्रमाणे अमितने सुनील यांचे फॅब्रिकेशनचे काम न करता त्यांची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.