Chikhali : दारू प्यायला पैसे न दिल्याने पत्नीवर लोखंडी ठोंब्याने मारहाण

एमपीसी न्यूज – पतीला दारू प्यायला पैसे न दिल्याने त्याने पत्नीला लोखंडी ठोंब्याने मारहाण केली. डोक्यात ठिकठिकाणी मारून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 13) मध्यरात्री बालघरे वस्ती, चिखली येथे घडली.

गणेश राम काळकुटे (वय 32, रा. बालघरे वस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जखमी पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Dehuroad : पैशांच्या वादातून चुलत्यास मारहाण; दोघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (Chikhali) यांचा पती गणेश याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे देण्यास फिर्यादीने नकार दिला असता त्याने फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी ठोंबा फिर्यादीच्या डोक्यात ठिकठिकाणी मारून गंभीर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांची आई भांडण सोडविण्यासाठी आल्या असता त्यांनाही आरोपीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत (Chikhali) म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.