BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – मोपेड दुचाकीला मागून धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात कुदळवाडी येथील जायका हॉटेल चौकात बुधवारी (दि. 20) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला.

अजित अशोकराव देशमुख (वय 38, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अजिनाथ ज्ञानदेव सांगळे (वय 28, रा. कोपर खैरणे, नवी मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजित त्यांच्या मोपेड दुचाकी (एमएच 12/एफ ई 6950) वरून कुदळवाडीमधील जायका चौकातून त्यांची पत्नी आणि मुलासोबत जात होते. त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात चालवून अजित यांच्या दुचाकीला मागून धडक दिली.

यामध्ये दुचाकीखाली पडली. त्यावेळी अजित यांची पत्नी गंभीर जखमी झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तसेच अजित आणि त्यांचा मुलगा देखील जखमी झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
.