Chikhali : लघुशंकेसाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग  

एमपीसी न्यूज – लघुशंकेसाठी गेलेल्या तरुणीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच तक्रार करण्यासाठी पोलिसांकडे गेल्यास, तुला बघून घेईन, अशी धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 22) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कुदळवाडी, चिखली येथे घडली.

याप्रकरणी 20 वर्षीय तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश रामरुप मौर्या (रा. जाधववाडी, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी भाजीपाल्याचा व्यवसाय करते. त्या रविवारी सायंकाळी लघुशंकेसाठी गेल्या असता आरोपी प्रकाश तिथे आला. त्याने तरुणीशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. तसेच ‘माझ्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी चौकीत गेली तर तुला बघून घेतो; अशी धमकी आरोपीने तरुणीला दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.