Chikhali : खर्चासाठी पैसे न दिल्यावरून तरुणाला कोयत्याने मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – खर्चासाठी पैसे न दिल्याने एका तरुणाला लाकडी दांडके तसेच कोयत्याने मारहाण केली. तसेच त्याच्या खिशातील साडेतीन हजार रूपये जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 2) रात्री साडेदहा ते साडेअकरा या कालावधीत टॉवर लाईन चिखली येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

कुणाल, संदेश ऊर्फ संजय जाधव, प्रविण सुकळे, अनिल वाकुडे, विजय घाटे, अशिषकुमार वरखडे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. चेतन रामभाऊ मांडले (वय 20, रा. एकता कॉलनी, चिखली) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास आरोपी आपसांत संगनमत करून फिर्यादी मांडले यांच्या घरात घुसले. आम्हाला खर्चासाठी पैसे दे, असे म्हणत त्यांनी पैशाची मागणी केली. मात्र, मांडले यांनी पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी मांडले यांना ओढत व मारहाण करीत आषिशकुमार वरखडे यांच्या खोलीत नेले. तिथे लाकडी दांडके व कोयत्याने मारहाण करीत मांडले यांच्या खिशातील साडेतीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच परिसरात दहशत निर्माण केली. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.