Chikhali : भर दिवसा गोळ्या घालून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज – पुणे ते पिंपरी चिंचवडमध्ये खुनाचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीये. किशोर आवारे हत्याप्रकारण ताजे असतानाच चिखली येथे भर दिवसा गोळ्या झाडून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. 

सोन्या तापकीर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिरगाव सरपंचाची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर तळेगाव दाभाडे येथे जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची भर दिवसा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली.

त्यांनतर पुन्हा एक खुनाची गंभीर घटना समोर आली आहे. चिखली गाव येथे सोन्या तापकीर याच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. ही घटना भर दिवसा रहदारीच्या मार्गावर घडली. गंभीर जखमी झालेल्या तापकीर याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

यामुळे प्रशासनावर प्रश्न निर्माण होतच असून बंदूक आणि कोयत्याचे वाढते साम्राज्य यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे मोठी समस्या निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.