Chikhali : गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – राहत्या घरात गळफास घेऊन तरूणाने आत्महत्या केली. ही घटना चिखली येथे गुरूवारी सकाळी घडली.

योगेश इंदल जाधव (वय 19, रा. नेवाळे वस्ती, चिखली) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश हा मूळचा जळगावचा रहिवासी असून सध्या तो बहिणीकडे राहण्यास होता. बहीण शिधापत्रिका आधार कार्डास लिंक करण्यासाठी बाहेर गेली होती. त्यावेळी घरात एकट्या असलेल्या योगेशने गळफास घेतला. तो शहरातील एका नामांकित कंपनीत तात्पुरता कामास होता. योगेश यांनी गुरूवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने पंख्याच्या हुकाला गळफास घेतला. शेजारी राहणाऱ्या नातेवाईकाने ही घटना पाहिल्यावर पोलिसांना याबाबत कळविले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी योगेश यांना वायसीएम रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.