Chikhli Crime : भाड्याने चालविण्यासाठी घेतलेली कार अन भाड्याचे पैसे न देता कार मालकाची फसवणूक

एमपीसी न्यूज – भाड्याने चालविण्यासाठी घेतलेली कार आणि ठरल्यानुसार मासिक भाडे न देता कार मालकाची फसवणूक केली. हा प्रकार शिवतेजनगर, चिंचवड येथे घडला आहे.

श्वेता विनीत देशपांडे (वय 42, रा. शिवतेजनगर, चिंचवड) यांनी याबाबत गुरुवारी (दि. 5) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विशाल राजेंद्र मिश्रा (रा. थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची साडेसहा लाख रुपये किंमतीची कार (एम एच 14 / एच जी 9312) आरोपी विशाल याने भाड्याने चालविण्यासाठी घेतली. त्याबाबत त्यांनी नोटराईज करून घेतले. त्यानुसार विशाल याने फिर्यादी यांना दरमहा 18 हजार रुपये भाडे देण्याचे ठरले होते. मात्र, विशाल याने ठरल्याप्रमाणे भाडे दिले नाही. तसेच फिर्यादी यांची कार देखील न देता त्यांचा विश्वासघात केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III