Chikhli Crime : अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या हॉटेलवर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; हॉटेल चालक, मालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने शेलारवस्ती, चिखली येथील सरपंच मळा या हॉटेलवर छापा टाकला. त्यात पोलिसांनी 36 हजारांची दारू आणि रोकड जप्त केली. तसेच हॉटेलचा मालक आणि चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

ही कारवाई मंगळवारी (दि. 10) रात्री सव्वानऊ वाजता करण्यात आली. हॉटेल व्यवस्थापक अजय कबीराज (वय 36), चिन्मय तरफदार (वय 34), हॉटेल मालक प्रविण पाटील यांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188, 269, 34, 65 (ई), महाराष्ट्र दारूबंदी कायदा, कलम 3, साथीचे रोग अधिनियम 1897 कलम 51 ( ब), राष्ट्रीय आपत्ती अधिनियम 2005 कलम 11, महाराष्ट्र कोविड उपाययोजना 2020 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा पथकाला माहिती मिळाली की, शेलारवस्ती, चिखली येथील हॉटेल सरपंच मळा येथे बेकायदेशीरपणे विनापरवाना दारू विक्री केली जात आहे. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी रात्री सव्वानऊ वाजता पोलिसांनी हॉटेलवर छापा मारला.

छाप्यामध्ये पोलिसांनी 62 हजार 482 रुपयांची देशी-विदेशी दारू, बिअर आणि 3 हजार 600 रुपयांची रोकड असा एकूण 66 हजार 82 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच हॉटेल चालक आणि मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजाराम पाटील, विशेष पोलीस अधिकारी विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, सहाय्यक फौजदार विजय कांबळे, पोलीस कर्मचारी सुनिल शिरसाठ, भगवंत मुठे, नितीन लोंढे, अनिल महाजन, अमोल शिंदे, वैष्णवी गावडे, गणेश कारोटे, योगेश तिडके यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1