Chikhli : कुदळवाडी येथील जुना नाला बुजविण्याचा भंगार व्यावसायिकांचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – कुदळवाडी परिसतील पवारवस्ती येथील उड्डाणपुलाजवळील जुना नाला बुजविण्याचा प्रयत्न काही भंगार व्यावसायिक आज (शुक्रवारी) करत होते. या प्रकाराची माहिती प्रभागाचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांना मिळताच त्यांनी पिंपरी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर घटनास्थळी धाव घेऊन नाला बुजविण्याचे काम थांबवले.

कुदळवाडीत पावसाच्या आणि घरातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाले आहेत. आज (शुक्रवारी) पवारवस्ती येथील उडडाणपुलाजवळील जुन्या जकात नाक्यासमोर जुना नाला बुजविण्याचा प्रयत्न काही भंगार व्यावसायिक करत होते. या प्रकाराची माहिती स्थानिक नागरिक नागरिक चद्रकांत जाधव यांनी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांना सांगितली.

यादव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती पिंपरी महापालिकेचे संबंधित अधिकारी पोपट घावटे यांना दिली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून नाला बुजविण्याचे काम थांबवले. नाला बुजवला असता तर पावसाचे पाणी जाण्यासाठी वाट राहिली नसती. त्यामुळे कुदळवाडीतील प्रत्येक नागरिकांनी जागरूकपणे अशा अनुचित प्रकाराची वेळीच दखल घेतली पाहिजे, असे यादव यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.