Chikhli : शिवजयंतीनिमित्त त्रिवेणीनगरमध्ये मंगळवारी नेत्रतपासणी, मोतीबिंदू निदान शिबिर

एमपीसी न्यूज – मायसेल्फ फाऊंडेशन संचलित इंद्रायणी आय क्लिनीक अॅण्ड ऑप्टीकल यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येत्या मंगळवारी (दि.19)अल्पदरात नेत्रतपासणी, मोतीबिंदू निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

त्रिवेणीनगर, श्रीकृष्ण हौसिंग सोसायटी येथील शॉप नंबर चार येथे मंगळवारी होणा-या शिबिराचे उद्‌घाटन देहूगाव प्राथिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी नेत्रतज्ज्ञ डॉ. संतोष सोमटकर, नेत्रतज्ज्ञ डॉ. तृणाली ठाकरे उपस्थित राहणार आहेत. सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत हे शिबिर होणार आहे.

या शिबिरात एक हजार रुपयांच्या फ्रेमवर दहा टक्के, दीड हजाराच्या फ्रेमवर 15 टक्के आणि दोन हजार रुपयांच्या फ्रेमवर 20 टक्के सवलत दिली जाणार आहे. अल्पदरात नेत्र तपासणीचा लाभ घेण्यासाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. सोमवार (दि.19) पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी शुल्क फक्त 20 रुपये असून नोंदणीसाठी 7887826311 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. जास्तीत-जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन, आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.