Chikhali News : गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणीटंचाई

एमपीसी न्यूज – चिखली भागातील पाटील नगर, बगवस्ती, देहू-आळंदी रोड वरील सर्वच सोसायट्यांना तसेच चिखली मधील देहू-मोशी रोडवरील रिव्हर रेसिडेन्सी, (Chikhali News) ऐश्वर्यम हमारा सोसायटी, क्रिस्टल पर्ल, मिलेनियम पॅरामाऊंट या इतर आजूबाजूंच्या सर्व सोसायट्यांना मागील 15 दिवसांपासून कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Actors in politics : कलाकारांनी राजकारणात पूर्णवेळ यावे का ?

फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले, ‘फ’ प्रभागातील पाणीपुरवठा विभागाच्या व पिंपरी-चिंचवड मनपातील पाणीपुरवठा विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांनी याबाबत पाठपुरावा करून देखील कोणतीही सुधारणा झालेली नाही. सर्वच सोसायट्यांमधील सदस्य प्रामाणिकपणे टॅक्स भारतात.(Chikhali News) तरी, प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात पाणी पुरवठा कमी प्रमाणात केला जातो ही चिंतेची बाब आहे. मनपाच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची आणि टँकर लॉबीची मिलीभगत यामागे आहे, असे वाटते. म्हणूनच कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.