Chikhli News : ‘इंटरनेट व सोशल मीडिया मुक्त …एक दिवस ग्राउंड वरती’ संकल्पने अंतर्गत बॅडमिंटन स्पर्धा

एमपीसी न्यूज- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केसर व्हॅली हाउसिंग सोसायटी, पाटील नगर, चिखली येथे सभासदांसाठी भव्य बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन (Chikhli News)केले गेले.

इंटरनेट व सोशल मीडिया मुक्त एक दिवस ग्राउंड वरती या संकल्पनेतून ही बॅडमिंटन स्पर्धा सभासदांसाठी आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी श्री कुंदन शेठ गायकवाड फ प्रभाग अध्यक्ष व मा.नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका, तसेच सामाजिक कार्यकर्ते युवा नेते विनायक आबा मोरे, चिखली मोशी हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष श्री संजीवन सागळे यांची उपस्थिती व सहकार्य लाभले.

Pune News : प्रसिद्ध इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनींंचा केला विनयभंग

या स्पर्धेमध्ये पुरुष गटातून प्रथम क्रमांक श्री सुनील गिरी तसेच द्वितीय क्रमांक श्री रामा पाधी, त्याचबरोबर महिला गटातून प्रथम क्रमांक सुचिता पाटील व द्वितीय क्रमांक पुनम परीट यांनी (Chikhli News)पटकावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.