Chikhli News : चिखली जलशुद्दीकरण केंद्रासमोरून 23 पाईप चोरीला

एमपीसी न्यूज – चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रासमोरून चोरट्यांनी 23 पाईप चोरून (Chikhli News)नेले. ही घटना 16 ते 18 डिसेंबर या कालावधीत घडली असून याबाबत 20 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोवर्धन रामराव पवार (वय 27, रा. मोशी) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri Crime News : झेरॉक्स व्यवस्थित न आल्याने दुकानात तोडफोड करत दुकानदार महिलेशी गैरवर्तन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटीलनगर, चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रासमोर पाण्याच्या पाईपलाईनचे पाईप ठेवण्यात आले आहेत. 16 ते 18 डिसेंबर या कालावधीत दोन लाख 72 हजार 486 रुपये किमतीचे 23 पाईप चोरून नेले. याबाबत गोवर्धन पवार यांनी चिखली पोलिसात तक्रार अर्ज दिला होता. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक राकेश गुमाने तपास (Chikhli News)करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.