Chikhli News :मालमत्ता कर न भरल्याने संपूर्ण हाऊसिंग सोसायटीचे नळ कनेक्शन तोडण्याला विरोध करणार :चिखली मोशी हाऊसिंग फेडेरेशन

एमपीसी न्यूज- काही सदस्यांनी मालमत्ता कर न भरल्याने जर पुर्ण हाऊसिंग सोसायटीचे (Chikhli News) नळ कनेक्शन मनपा तोडणे चालूच ठेवत असेल तर चिखली मोशी हाऊसिंग फेडेरेशन तीव्र आंदोलन करणार असल्याचे फेडरेशन अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी सांगितले आहे. 

आज दुपारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने चिखली मध्ये कारवाई करून ऐश्वर्यम कोर्टयार्ड व साई श्रद्धा पार्क या दोन हाऊसिंग सेटिंग चे पाणी कनेक्शन बंद केले कारण त्या सोसायटींमधील काही सदस्यांनी मनपाचा मालमत्ता कर भरला नव्हता. ऐश्वर्यम कोर्टयार्ड सोसायटीमध्ये 300 हून अधिक सदनिका आहेत तर साई श्रद्धा पार्क मध्ये 246 सदनिका आहेत.

याविषयी माहिती देताना, सांगळे म्हणाले की 20 ते 25 टक्के सदनिकाधारकांनी मालमत्ता कर न भरल्याने आज मनपाने या दोन हाउसिंग सोसायटींचे पाणी कनेक्शन बंद केले होते. सोसायटीमधील 75 टक्के सदनिकाधारक ज्यांनी कर भरला आहे त्यांच्यावर हा अन्याय आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या तीव्र विरोधात आहोत.

Pune Crime News : ऑनलाईन ॲपवरुन झालेल्या ओळखीतून तरुणीने केली तरुणाची 5 लाख रुपयांची फसवणूक

ते पुढे म्हणाले की मनपा पुरेसे पाणी देत नसल्याने आम्ही टँकरचे पाणी विकत घेतो. रस्ते चांगले नसून त्यांच्यावरील खड्ड्यांमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. मनपा (Chikhli News) आमचा कचरा वेळेवर उचलत नाही. मनपा आम्हाला पुरेश्या सुविधा देत नसताना ही अशी कारवाई करत आहे. मनपाने आम्हाला सर्व सोई सुविधा पुर्ण पुरवाव्यात  व त्यानंतर कारवाई करावी.

सांगळे म्हणाले की आजच्या कारवाईच्या विरोधात उपआयुक्त निलेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की ,आयुक्त जांभळे पाटील यांच्या आदेशानुसार कारवाई केली आहे. पण नंतर जांभळे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे कोणतेही आदेश दिले नसल्याचे सांगितले. तसेच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना या कारवाई बद्दल सांगितल्यानंतर ते आयुक्त व अतिरिक्त आयुक्ताशी बोलले व त्यानंतर तोडलेले पाणी कनेक्शन परत जोडण्यात आले आहे.

PCMC : रस्त्यांवरील खड्डे बुजवा; नागरिकांची जनसंवाद सभेत मागणी

सांगळे म्हणाले की मनपा च्या कर संकलन विभागामध्ये शहरातील हजारो मिळकतींची नोंद नाही. कर संकलन विभागाने त्या शोधून त्यांच्याकडून कर वसुली सूरू करावी. काही सदस्यांनी मालमत्ता कर न भरल्याने जर पुर्ण हाऊसिंग सोसायटीचे नळ कनेक्शन मनपा तोडणे चालूच ठेवत असेल तर चिखली मोशी (Chikhli News)हाऊसिंग सोसायटी फेडेरेशन त्याच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहे. तसेच मनपाच्या कर संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोसायटीमध्ये प्रवेश करू देणार नाही. सोसायटीविरोधात गुन्हे नोंद केले तरीही चालतील.

चिखली, मोशी, तळवडे, दिघी, चऱ्होली व इतर भागातील हाऊसिंग सोसायट्या चिखली मोशी हाऊसिंग सोसायटी फेडेरेशनचे सदस्य आहेत.वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, पिंपरी, रहाटणी, रावेत, तथावडे व इतर भागातील हाऊसिंग सोसायट्या पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशनचे सदस्य आहेत.पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय देशमुख यांनी सुद्धा मनपाच्या या कारवाईचा विरोध करणार असल्याचे सांगितले.निलेश देशमुख, उप आयुक्त, करसंकलन विभाग यांना फोन केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.