Chikhli : अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ ‘निर्भया नारी’ मेळावा

एमपीसी न्यूज – चिखली येथील निर्भया नारी मंचचा वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी सर्व निर्भया नारी मंचच्या महिलांनी डॉ. अमोल कोल्हे यांना पाठिंबा जाहीर केला. कोल्हे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार या मेळाव्यात झाला. 
यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, प्रवक्ता फजल शेख, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, निर्भया नारी मंचच्या संस्थापिका व भोसरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा मनीषा गटकळ, अरुण बो-हाडे, सविता धुमाळ, मीना उंबरकर, विनोद कांबळे. अनिल भोसले, हनुमंत गटकळ, प्रशांत जाधव, लता पिंपळे, शीला भोंडवे, बळीराम गटकळ, अधिक थोरात, मनोज सुतार, प्रकाश सोमवंशी, प्रीती मोकाशी आदी उपस्थित होते.

  • अजित पवार म्हणाले, ” लोकसभेत शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला नवीन चेहरा म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. महिलांनी अमोल कोल्हे याना लोकसभेत पाठवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  मोदी मुक्त देश करण्यासाठी राष्ट्रवादींच्या उमेदवाराला विजयी करा. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सुप्त लाट आहे. या लाटेचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसणार आहे. याउलट या सुप्त लाटेचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसच्या आघाडीच्या उमेदवारांना होणार आहे “
मनीषा गटकळ म्हणाल्या की, निर्भयाच्या माध्यमांतून काम करत असताना ज्या अडचणी आल्या त्या सोडविण्याचे सहकार्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार  व त्यांच्या शिलेदारांनी केले. त्यामुळे निर्भया नारी मंचच्या सर्व महिलांकडून मी डॉ. अमोल कोल्हे यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. पुष्पा शेळके यांनी सूत्रसंचालन केले व सविता धुमाळ यांनी आभार मानले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.