Chikhli : स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन

एमपीसी न्यूज –  स्वामी विवेकानंद यांच्या 156 व्या जयंतीचे औचित्य साधून श्री स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानने चार दिवसीय जयंती उत्सव आणि स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे .चिखली येथील स्वामी विवेकानंद सभामंडपात बुधवार दि. 9 ते शनिवारी दि. 12 जानेवारी 2019 या कालावधीत ही व्याख्यानमाला होणार आहे. या व्याख्यानमालेचे भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे,पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नवी मुंबई उपायुक्त नितीन काळे आणि उद्योजक गिरीधर काळे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन आहे.

बुधवारी युवा व्याख्याते औदुंबर बुधावले-पाटील ‘चरित्र अशी घडतात’, गुरुवार दि. 10 जानेवारीला वृषाली धर्मे-पाटील ‘मला काही सांगायचंय’, शुक्रवार दि.11 जानेवारीला प्रा. वसंत हंकारे ‘चला आता माणूस घडवू’, शनिवार दि.12 जानेवारीला आयुक्त श्रावण हर्डीकर हे ‘आजचा युवक….उद्याची दिशा’ याविषयावर बोलणार आहे.

या व्याख्यानमालेत बुधवारी पिंपरी-चिंचवड विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक केशव घोळवे, पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, योगिराज पतसंस्था संचालक अनिल खैरे, नवनगर प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेविका मंगला कदम, नगरसेविका योगिता नागरगोजे आणि व्याख्यानमाला समिती सदस्य सुदाम मोरे, माजी आमदार विलास लांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर, क्रीडा-सांस्कृतिक सभापती संजय नेवाळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, टाटा मोटर्स मनुष्यबळ विभागप्रमुख सरफराज मणेर, जलसंधारण माजी सभापती हनमंत बनसुडे आणि व्याख्यानमाला समिती कार्यवाह राजेंद्र घावटे उपस्थित राहणार आहे.

व्याख्यानापूर्वी दररोज सायंकाळी सहा ते सात या वेळात सोहम म्युझिक आयोजित भावगीते, भक्तिगीते, अभंगवाणी अशा सुगम संगीताचे माउली ईटकर, पं.नारायण जगताप, दिगंबर राणे, भाऊसाहेब सोलट,निवृत्ती धामेकर सादरीकरण करतील; तसेच ‘स्वरसंवाद’ कार्यक्रमांतर्गत वैशाली चौधरी आणि सहकारी शास्त्रीय गायन करतील.

सर्व नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष रामराजे बेंबडे आणि शरद नगर वीर हनुमान सेवा समिती अध्यक्ष महेश मांडवकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.