Chikhali : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पंधरावे पोलीस ठाणे चिखली येथे सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिखली पोलीस ठाणे सुरु करण्यात आले. हे 15 वे पोलीस ठाणे आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आणि पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्या उपस्थितीत चिखली पोलीस ठाण्याचे उद्घाटन झाले. चिखली पोलीस ठाण्याचे पहिले वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून विवेक मुगळीकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) म्हणून शंकर आवताडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस ठाण्याच्या उद्घाटनासाठी आमदार गौतम चाबुकस्वार, महापौर राहुल जाधव, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक, वरिष्ठ पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.

चिखली पोलीस ठाण्यासाठी सोमवारी (दि. 8) आठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. तसेच निगडी, सांगवी, चिंचवड पोलीस ठाणे आणि नियंत्रण कक्षातून एकूण 100 कर्मचारी चिखली पोलीस ठाण्यासाठी शनिवारी (दि. ६) वर्ग करण्यात आले. नवीन आलेल्या मनुष्यबळामुळे चिखली पोलीस ठाणे सुरु झाले आहे.

चिखली पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आलेले अधिकारी –

पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे (निगडी पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन)

सहायक पोलीस निरीक्षक सतिश सुरेश कांबळे (पिंपरी पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन)

सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश जगन्नाथ जगदाळे (निगडी पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन)

पोलीस उपनिरीक्षक संदीप अशोक बागुल (निगडी पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन)

पोलीस उपनिरीक्षक योगेश भास्कर शिंदे (निगडी पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन)

पोलीस उपनिरीक्षक भरत विठ्ठलराव चपाईतकर (पिंपरी पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन)

महिला पोलीस उपनिरीक्षक रत्नमाला त्र्यंबकराव सावंत (एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन)

पोलीस उपनिरीक्षक मधुसुदन आर. घुगे (पिंपरी पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.