Chikhli Rape Case : चिखलीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एमपीसी न्यूज : चिखलीमध्ये 25 जून रोजी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Chikhli Rape Case) करण्यात आला. याबाबात पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. निलेश भानवसे (वय 25 वर्षे) व एक महिला, (दोघे रा. श्रीराम हौसिंग सोसायटी, ताम्हाणेवस्ती, चिखली) हे आरोपी आहेत. त्यांच्यावर भा. द. वि. कलम 376(3), 506, पोक्सो कायदा कलम 3, 4, 7, 8 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी व आरोपी महिला ह्या एकाच परिसरात राहत असल्याने त्यांची ओळख झाली होती. नंतर आरोपी महिला श्रीराम हौसिंग सोसायटी, ताम्हाणे वस्ती, चिखलीमध्ये राहण्यास गेली. 13 जूनला तिने फिर्यादीस दुपारी 1 वा तिच्या घरी बोलावले. तिथे गेल्यावर त्या महिलेचा दिर निलेश भानवसे याने फिर्यादी सोबत जबरदस्ती संभोग केला. दोघा आरोपीनी संगनमत करून तक्रारदार यांना झालेला प्रकार (Chikhli Rape Case) कोणाला सांगितला, तर बदनामी करण्याची धमकी दिली.

Pimpri Crime : खोटे बोलण्यास नकार दिल्याने भर रस्त्यात 19 वर्षीय मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.