Chikhli : चिखलीमध्ये राष्ट्रवादी सोशल मिडियाच्या वतीने महिला पत्रकारांचा सन्मान

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला अध्यक्षा तथा राष्ट्रवादी महिला सोशल मिडियाच्या शहराध्यक्षा मनीषा गटकळ याच्या वाढदिवसानिमित्त महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

चिखली येथील स्वामी विवेकानंद हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, यशस्विनी अभियानाच्या राज्यसमन्वयक वैशाली मोटे, युवा नेते अमजद पठाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, फजल शेख, विशाल काळभोर, सुलक्षणा धर, माजी महापौर मोहिनी लांडे, वर्षा जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी लीना माने, सायली कुलकर्णी, आशा साळवी, मनीषा थोरात, शबनम सय्यद, शर्मिला पवार, गणेश हुंबे, या पत्रकारांचा तसेच आरोग्य विभागातील उत्कृष्ट कार्य केलेल्यांचे सत्कार करण्यात आला. तसेच परिसरातील कचरावेचक महिलांना साडीचोळी देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या, “राष्ट्रवादीतील सर्व आघाड्यांनी तसेच महिला आघाडीने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, पक्षाला पुढे नेण्यासाठी एकजुटीने काम करा. महिला आर्थिकदृष्टया स्वावलंबी झाली की घरातुन सुध्दा हळुहळु मदत मिळू लागते. त्यासाठी महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आवश्यक आहे” वैशाली मोटे, संजोग वाघेरे, दत्ता साने यांनी मनोगत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.