गुरूवार, डिसेंबर 8, 2022

Chakan : संपत्ती नावावर करण्यावरून मुलाकडून वडिलांना मारहाण

एमपीसी न्यूज – संपत्ती नावावर करून देण्याची मागणी करत मुलाने वडिलांना मारहाण केली. यामध्ये वडील गंभीर जखमी झाले असल्याचा गुन्हा चाकण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 1) दुपारी साडेतीनच्या सुमारास महाळुंगे येथे घडला.

कैलास राघू बवले (वय 61, रा. महाळुंगे, चाकण) असे जखमी पित्याचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रमेश कैलास बवले (वय 26) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास फिर्यादी कैलास त्यांच्या घरासमोर उभे होते. त्यावेळी त्यांचा आरोपी मुलगा रमेश त्यांच्याकडे आला. कैलास यांच्या नावावर असलेली सर्व प्रॉपर्टी रमेश याने स्वतःच्या नावावर करून देण्याची मागणी केली. कैलास यांनी प्रॉपर्टी नावावर करण्यास नकार दिला. यावरून रमेश याने कैलास यांना लोखंडी पाईपने मारहाण केली. यामध्ये कैलास यांच्या डोक्याला, पायाला, हाताला गंभीर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Latest news
Related news