Nigdi : किरकोळ कारणावरून दाम्पत्यासह मुलाला मारहाण

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या कडेला टेम्पो लावण्यावरून चौघांनी दाम्पत्यासह मुलाला जबर मारहाण केली. ही घटना गुरूवारी रात्री साडेनऊ वाजता निगडीतील पीसीएमसी कॉलनी येथे घडली.

आनंद दिलीप लोट (वय-39, रा. पीसीएमसी कॉलनी, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेखर, गोलू, ममड्या, मह्या (रा. पीसीएमसी कॉलनी, पूर्ण नाव माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोट टेम्पो चालक आहेत. गुरूवारी ते टेम्पो पीसीएमसी कॉलनी येथील रस्त्यावर लावत होते. यावरून आरोपींनी फिर्यादी यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. त्यांना शिवीगाळ करत हाताने, लाकडी दांडकने, कोयत्याने, दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले.

फिर्यादी यांच्या पत्नी त्यांना सोडविण्यासाठी आल्या असता त्यांनाही आरोपींनी मारहाण करत त्यांचे दोन दात पाडले. फिर्यादी यांच्या मुलाला व त्यांच्या नातेवाईकांनाही मारहाण केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.