Bhosari : संत निरंकारी मिशनद्वारा बाल संत समारोहाचे आयोजन

एमपीसी न्यूज-सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज (Bhosari ) यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील संत निरंकारी सत्संग भवन भोसरी येथे रविवार दि. 28 मे  रोजी  बाल समागम सकाळी 11 ते 2 या वेळेत संपन्न होणार आहे.या बाल समागम ला पुणे झोन मधून 1500 हुन अधिक लहान बालके उपस्थित राहणार आहेत.

 आज संत निरंकारी मिशन लहान मुलांना आध्यात्मिकतेचे धडे  देऊन त्यांना नैतिकता, मानवी गुण शिकवून समाजासाठी एक सुजाण नागरिक बनवण्याचे कार्य करीत आहे. सुसंस्कारित मुले उत्तम समाज निर्माण करू शकतात त्यासाठी मुलांचा बौद्धिक,मानसिक,आध्यात्मिक विकास होणे गरजेचे आहे. मुलांना शिक्षणाबरोबर चांगल्या संस्काराची गरज आहे, हे संस्कार केवळ संतांच्या सानिध्यात मिळत असतात म्हणून निरंकारी सत्संगच्या माध्यमातून असे विशाल बाल संत समागम आयोजित केले जातात.

 

Kalewadi : कोयत्याने वार करत तरुणावर टोळक्याचा जिवघेणा हल्ला

 या बाल समारोहामध्ये  लहान-लहान मुल अवतारवाणी गायन, हरदेव वाणी गायन, कवी दरबार, नाटिका,गीत, विचार यां द्वारे सदगुरु चा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवून आशीर्वाद प्राप्त करतील. या सत्संग सोहळ्याला संत निरंकारी मंडळाच्या वतीने अम्रितपाल सिंह (गुजरात) यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते उपस्थित बालकांना मार्गदर्शन करतील अशी माहिती ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रमुख) यांनी (Bhosari ) दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.