Pimple Gurav News : बालगोपाळांनी केली नदीतील जलपर्णीची होळी

एमपीसी न्यूज – होळी निमित्त भालेकर नगर, पिंपळे गुरव येथे बालगोपाळांनी केली डास आणि नदीतील जलपर्णीला जाळून होळी साजरी केली. दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी बालगोपाळांना एकत्र केले आणि पर्यावरणाचा संदेश देणारी होळी साजरी केली.

यामध्ये आर्या गोळे, ओवी कंक, विश्वराज कंक, रुद्रा पाटील, आरोह पाटील, अनुष्का सुपे, सृष्टी तटपटे, सिद्धेश सुपे, श्रेया तटपटे, प्रज्वल भाटे, स्फूर्ती एरुणकर या लहान मुलांनी सहभाग घेतला.

_MPC_DIR_MPU_II

‘रोज आपल्याला डास चावतात ना ! त्या डासांचे चित्र काढा मुलांनो ! आपल्या नदीत जलपर्णी वाढलीय खुप म्हणून नदी किनारी असलेल्या अनेक गावात डास फार झालेत. म्हणून अशा पद्धतीने आपण होळी साजरी करुया’, असे सुरेश कंक यांनी लहान मुलांना समजावले. व पर्यावरणाचा संदेश देत होळी साजरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.