Talegaon News : कलापिनी बाल भवनच्या मुलांची होळी उत्साहात

एमपीसी न्यूज –  “होळी रे होळी पुरणाची पोळी.. कचऱ्याच्या पोटात मारुया गोळी” अश्या आरोळ्यांनी बालभवनचा परिसर दुमदुमून गेला. मुलांनी मोठ्या उत्साहात पर्यावरणपूरक होळीचा सण साजरा केला.

गेली 20 वर्षे कलापिनी बालभवनची  पर्यावरण पूरक होळी साजरी केली जाते. मुलांना आठवडाभर नको असलेले कागद,कचरा गोळा करायला सांगून त्याची होळी करण्यात येते. मीरा कोंनुर यांनी मुलांना स्वछतेचे,पर्यावरण विषयक माहिती देऊन होळीची गोष्ट सांगितली.  मुलांबरोबर पालकही यात सहभागी झाले होते.

रामचंद्र रानडे आणि विजय कुलकर्णी यांच्या हस्ते होळीची पूजा करण्यात आली.  याकार्यक्रमाला कलापिनी संस्थेच्या कार्याध्यक्षा अंजली सहस्रबुद्धे उपस्थित होत्या. मुलांनी “जय भवानी जय शिवाजी” अश्या  घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला. होळी साठी मोठ्या संख्येने पालक आणि इतर मंडळी उपस्थित होती

बालभवन प्रमुख मधुवंती रानडे, अनघा बुरसे  तसेच सर्व प्रशिक्षकांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला. पालकांनी कलापिनी बाल भवन असे विविध उपक्रम घेऊन मुलांना उत्तम संस्कार देते या बद्दल समाधान व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.