Chimbali Crime News : तडीपार आरोपीची पोलिसांना शिवीगाळ

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला आरोपी कोणतीही परवानगी न घेता शहराच्या हद्दीत आला. त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्याने शिवीगाळ केली. याप्रकरणी त्याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई मंगळवारी (दि. 27) सायंकाळी सहा वाजता खेड तालुक्यातील चिंबळी येथे करण्यात आली.

गौरव धर्मराज भूमकर (वय 23, रा. चिंबळी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल राजाराम महादेव लोणकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौरव भुमकर याला 26 एप्रिल 2021 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. त्यानंतर आरोपी पोलिसांची अथवा शासनाची कोणतीही परवानगी न घेता शहराच्या हद्दीत आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलीस त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गेले.

त्यावेळी आरोपीने पोलिसांना शिवीगाळ करत धमकी दिली. पोलीस करत असलेल्या शासकीय कामात आरोपीने अडथळा निर्माण केला. याबाबत याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.