Chikhali : खाऊ आणण्यासाठी दुकानाला गेलेल्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – खाऊ आणण्यासाठी गेलेल्या सहा वर्षीय चिमुरडीवर दुकानातील कामगाराने लैंगिक अत्याचार केला. ही घटना रविवारी (दि. 24) दुपारी दीडच्या सुमारास चिखली येथे घडली.

अंकुश वसंतराव हुंडाळकर (रा. चिखली), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या 33 वर्षीय आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सहा वर्षीय मुलगी रविवारी दुपारी दीडच्या सुमारास आरोपीच्या दुकानात पापडी व बॉबी आणण्यासाठी गेली. त्यावेळी दुकानात काम करणा-या आरोपीने चिमुकलीसोबत अत्याचार केला. मुलीने घरी आल्यानंतर हा प्रकार आपल्या आईला सांगितला. आईने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.