Chincholi News : जाधव फायटर संघाने पटकावले जाधव प्रीमियर लीगचे विजेतेपद

एमपीसीन्यूज : हनुमान व्यायाम मंडळ, जाधव तालीम आयोजित जाधव प्रीमियर लीग 2021  टेनिस बॉल हाफ पीच क्रिकेट स्पर्धेत चिंचोलीच्या जाधव फायटर संघाने विजेतेपद पटकावले. या संघाला आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे रोख 21 हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, बक्षिसाची रोख रक्कम चिंचोली गावातील महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देण्यात आली.

देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ पानसरे, पंडित जाधव, श्रीरंग सावंत, निवृत्ती बालघरे, बाळासाहेब जाधव, संजय सावंत यांच्या उपस्थित जाधव प्रिमीयर लीगचे उदघाटन करण्यात आले. यावेळी चार संघानी स्पर्धेत सहभाग घेतला.

_MPC_DIR_MPU_II

त्यात पै. धनंजय विनायक सावंत यांचा मालकीच्या जाधव फायटर व कमलेश जाधव यांच्या मालकीच्या जाधव वाॅरियर यांच्यात अंतिम सामना रंगला. यामध्ये जाधव फायटर या संघाने जाधव वाॅरियरचा पराभव करीत या लीगच्या पहिल्या सत्राचे विजेतेपद पटकावले. आमदार सुनिल शेळके त्यांच्या हस्ते विजयी संघाला प्रथम क्रमांकाचे बक्षिस देण्यात आले.

तसेच पिंपरी चिंचवड ते पानिपत सायकल मोहीम यशस्वी करणाऱ्या प्रशांत जाधव, विश्वास काशीद, बजरंग मोळक, नारायण मालपोटे, निलेश धावडे, अंशुमन धावडे यांचा पै. धनंजय विनायक सावंत स्पोर्टस् फांऊडेशनच्या वतीने आमदार शेळके यांच्या हस्ते गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. पत्रकार वसंत भेगडे व देवराम भेगडे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.